शालेय जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यात इयत्ता १० वी व १२ वी या दोन वर्गांना अतिशय महत्व आहे.इयत्ता बारावी हा करियरचा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जातो आणि त्यातील १२ वी सायन्स या विभागाकडे तर अत्यंत संवेदनशील प्रकारे पहिले जाते.
या टप्प्यात जर विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले तर त्यांच्या भविष्यातील बरेच प्रश्न या वर्गातच सुटलेले असतात.आज बारावी सायन्स या शैक्षणिक वर्षाचे आपण अवलोकन केले तर आपल्याला असा दिसून येईल की या टप्प्यावर विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.
Smart Education ही संस्था गेल्या १० वर्षांपासून बारावी हा विषय घेऊन शैक्षणिक क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करत आहे.या संस्थेच्या तज्ञ शिक्षकांनी मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून बारावीचा विद्यार्थी,पालक,शिक्षक,क्लास,या सर्व बाबींचा अभ्यास करून एक उपक्रम तयार केलेला आहे.विद्यार्थ्याचा परीक्षेचा सराव तसेच सर्वांगीण विकास होऊन त्यात एक निकोप स्पर्धा असावी यासाठी ही संस्था महाराष्ट्रात प्रथमच बारावीसाठी स्कॉलरशिप स्पर्धा आयोजित करत आहे.
तज्ञ व अनुभवी शिक्षकवृदांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था,प्रश्न-उत्तररूपी नोटस,परीक्षेचे तालुक्यांच्या ठिकाणी नियोजन,बोर्डाच्या धर्तीवर पेपर तपासणी,जिल्हास्तरावर करीयरविषयी तज्ञांचे मार्गदर्शन व परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल स्कॉलरशिप ही या संस्थेची प्रमुख वैशिष्टे आहेत.या स्कॉलरशिप परीक्षेचा आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले मार्क वाढविले आहेत.आपणही या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या पाल्याची गुणवत्ता वाढ होण्यासाठी त्यास मदत करावी हीच अपेक्षा.